५२४. कुत्रे
काही इमानी काही लाचार
दुसऱ्या हाती त्यांची सूत्रे
सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी
माणसांचेच केलेत कुत्रे
नेते असतात बाराबोड्याचे
कुत्र्यांना ते वाटतात सोवळे
कुत्रे घेतात एकमेकांना चावे
नेते घालतात गळ्यात गळे
ही लोकशाही आल्यापासून
दुर्जनांचे आहे फावले
मी खरं बोललो तर
सारे कुत्रे मलाच चावले
--- लबाड बोका
काही इमानी काही लाचार
दुसऱ्या हाती त्यांची सूत्रे
सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी
माणसांचेच केलेत कुत्रे
नेते असतात बाराबोड्याचे
कुत्र्यांना ते वाटतात सोवळे
कुत्रे घेतात एकमेकांना चावे
नेते घालतात गळ्यात गळे
ही लोकशाही आल्यापासून
दुर्जनांचे आहे फावले
मी खरं बोललो तर
सारे कुत्रे मलाच चावले
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा