५२०. निवडणूक
तसं बघायला गेलं तर
कोणीच नसतो साधाभोळा
प्रत्येक जणच असतो ठेवून
कशावर ना कशावर डोळा
दिसतं तसं नसतं म्हणून
फसत असतं म्हणतात जग
मी मी म्हणवणाऱ्यांना सुद्धा
फसवून जात असतात ठग
संधी जेव्हा मिळते तेव्हा
जो तो करतो भ्रष्टाचार
अपवादात्मक काही माणसं
आचरतात चांगले विचार
काही उपयोग नाही तसा
पुन्हा पुन्हा तेच चिवडून
उडदामाजी काळे गोरे
काय घ्यावेत निवडून
--- लबाड बोका
तसं बघायला गेलं तर
कोणीच नसतो साधाभोळा
प्रत्येक जणच असतो ठेवून
कशावर ना कशावर डोळा
दिसतं तसं नसतं म्हणून
फसत असतं म्हणतात जग
मी मी म्हणवणाऱ्यांना सुद्धा
फसवून जात असतात ठग
संधी जेव्हा मिळते तेव्हा
जो तो करतो भ्रष्टाचार
अपवादात्मक काही माणसं
आचरतात चांगले विचार
काही उपयोग नाही तसा
पुन्हा पुन्हा तेच चिवडून
उडदामाजी काळे गोरे
काय घ्यावेत निवडून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा