५२७. अथांग
तुझेच विचार येत असतात
सारखे माझ्या मनात
तूच आहेस वाटतं भरून
सृष्टीच्या कणाकणात
पशू पक्षी झाडे मासे
टाकतात मला कोड्यात
तू आहेस सर्व व्यापून
मी आहे थोड्यात
तू आहेस माझ्यासाठी
अजूनही रहस्य गूढ
मान्य नाहीत मला तुझ्या
प्रचलित कथा रूढ
शोध घेतोय माझ्या परीने
पण तूच आता सांग
आयुष्य आलंय सरत तरी
लागत नाहीय थांग
--- लबाड बोका
तुझेच विचार येत असतात
सारखे माझ्या मनात
तूच आहेस वाटतं भरून
सृष्टीच्या कणाकणात
पशू पक्षी झाडे मासे
टाकतात मला कोड्यात
तू आहेस सर्व व्यापून
मी आहे थोड्यात
तू आहेस माझ्यासाठी
अजूनही रहस्य गूढ
मान्य नाहीत मला तुझ्या
प्रचलित कथा रूढ
शोध घेतोय माझ्या परीने
पण तूच आता सांग
आयुष्य आलंय सरत तरी
लागत नाहीय थांग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा