५२८. स्वप्न यशाचं
सालं आपलं नशिबच खोटं
असंच होतं दरवेळी
जिंकता जिंकता शेवटच्या क्षणी
उलटून पडते सगळी खेळी
पूर्वी वाटायचं खूप वाईट
आत्ता साली झाली सवय
आत्ता तर वाटू लागलंय
असंच सालं व्हायला हवंय
मला यश मिळणं म्हणजे
पश्चिमेला उगवणं सूर्य
कधी चुकून मिळालंच तर
माझं मलाच वाटेल आश्चर्य
तरी जात नाही खाज
पुन्हा पुन्हा मारतो उड्या
कधीतरी उभारीन म्हणतो
माझ्याही यशाच्या गुढ्या
--- लबाड बोका
सालं आपलं नशिबच खोटं
असंच होतं दरवेळी
जिंकता जिंकता शेवटच्या क्षणी
उलटून पडते सगळी खेळी
पूर्वी वाटायचं खूप वाईट
आत्ता साली झाली सवय
आत्ता तर वाटू लागलंय
असंच सालं व्हायला हवंय
मला यश मिळणं म्हणजे
पश्चिमेला उगवणं सूर्य
कधी चुकून मिळालंच तर
माझं मलाच वाटेल आश्चर्य
तरी जात नाही खाज
पुन्हा पुन्हा मारतो उड्या
कधीतरी उभारीन म्हणतो
माझ्याही यशाच्या गुढ्या
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा