५३०. पताका
तडजोडी करता करता
भावनाच झाल्या मिंध्या
एवढं करून सुद्धा झाल्या
आयुष्याच्या चिंध्या
चिंध्या कसल्या लक्तरंच ती
वेशीवर टांगलेल्या अब्रूची
जगताही येत नाही धड
अशी सगळी झालीय गोची
तरी कधीतरी चुकून दिसते
अंधारातून किरण शलाका
नकळत फडकवतो आनंदाने
चिंध्यांच्याच करून पताका
--- लबाड बोका
तडजोडी करता करता
भावनाच झाल्या मिंध्या
एवढं करून सुद्धा झाल्या
आयुष्याच्या चिंध्या
चिंध्या कसल्या लक्तरंच ती
वेशीवर टांगलेल्या अब्रूची
जगताही येत नाही धड
अशी सगळी झालीय गोची
तरी कधीतरी चुकून दिसते
अंधारातून किरण शलाका
नकळत फडकवतो आनंदाने
चिंध्यांच्याच करून पताका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा