५३१. प्रयोग
मी म्हणजे आहे खरंतर
एक अदृश्य आत्मा
म्हणून ह्या शरीराची
बाळगावी लागते तमा
शरीराशिवाय नाही मुळी
ओळखही माझी साधी
स्मृतींमध्ये भरलाय नुसता
काळोख अनंत अनादी
कसं असेल अस्तित्व माझं
ह्या शरीराशिवाय
जन्मापूर्वी नी मृत्यूनंतर
असतं तरी काय
करायचा आहे प्रयोग मला
मारून कोणाला तरी
वाट बघतोय कधीचा मी
या ना एकदा घरी
--- लबाड बोका
मी म्हणजे आहे खरंतर
एक अदृश्य आत्मा
म्हणून ह्या शरीराची
बाळगावी लागते तमा
शरीराशिवाय नाही मुळी
ओळखही माझी साधी
स्मृतींमध्ये भरलाय नुसता
काळोख अनंत अनादी
कसं असेल अस्तित्व माझं
ह्या शरीराशिवाय
जन्मापूर्वी नी मृत्यूनंतर
असतं तरी काय
करायचा आहे प्रयोग मला
मारून कोणाला तरी
वाट बघतोय कधीचा मी
या ना एकदा घरी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा