५३५. शब्दमय मी
शब्दच ऐकतो शब्दच बोलतो
शब्दांचीच मला पडलीय भूल
शब्दच लिहितो शब्दच वाचतो
शब्दांचंच मला लागलंय खूळ
शब्दच रचतो शब्दच गुंफतो
शब्दांनाच मी लावतो चाल
शब्दच गातो शब्दच नाचतो
शब्दांचाच मी धरतो ताल
शब्दच हेरतो शब्दच पेरतो
शब्दांचंच मी लावतो झाड
शब्दच खुलतो शब्दच फुलतो
शब्दांचाच मग येतो पाड
शब्दच देतो शब्दच घेतो
शब्दांनीच मी करतो व्यवहार
शब्दच जाणतो शब्दच ताणतो
शब्दांनीच मी आणतो बहार
शब्दच धरतो शब्दच भारतो
शब्दांवरच मी होतो स्वार
शब्दच चारतो शब्दच मारतो
शब्दांनीच मी करतो वार
शब्दच शोधतो शब्दच बोधतो
शब्दांचाच मला भारी सोस
शब्दच जागवतो शब्दच रागवतो
शब्दांनीच मी भागवतो हौस
शब्दच जाळतो शब्दच पोळतो
शब्दांनीच मी देतो आच
शब्दच गाळतो शब्दच टाळतो
शब्दांनीच मी देतो जाच
शब्दच जगतो शब्दच स्मरतो
शब्दांवरच मी टाकतो भार
शब्दच सुखावतो शब्दच दुखावतो
शब्दांतच मी मरणार यार
--- लबाड बोका
शब्दच ऐकतो शब्दच बोलतो
शब्दांचीच मला पडलीय भूल
शब्दच लिहितो शब्दच वाचतो
शब्दांचंच मला लागलंय खूळ
शब्दच रचतो शब्दच गुंफतो
शब्दांनाच मी लावतो चाल
शब्दच गातो शब्दच नाचतो
शब्दांचाच मी धरतो ताल
शब्दच हेरतो शब्दच पेरतो
शब्दांचंच मी लावतो झाड
शब्दच खुलतो शब्दच फुलतो
शब्दांचाच मग येतो पाड
शब्दच देतो शब्दच घेतो
शब्दांनीच मी करतो व्यवहार
शब्दच जाणतो शब्दच ताणतो
शब्दांनीच मी आणतो बहार
शब्दच धरतो शब्दच भारतो
शब्दांवरच मी होतो स्वार
शब्दच चारतो शब्दच मारतो
शब्दांनीच मी करतो वार
शब्दच शोधतो शब्दच बोधतो
शब्दांचाच मला भारी सोस
शब्दच जागवतो शब्दच रागवतो
शब्दांनीच मी भागवतो हौस
शब्दच जाळतो शब्दच पोळतो
शब्दांनीच मी देतो आच
शब्दच गाळतो शब्दच टाळतो
शब्दांनीच मी देतो जाच
शब्दच जगतो शब्दच स्मरतो
शब्दांवरच मी टाकतो भार
शब्दच सुखावतो शब्दच दुखावतो
शब्दांतच मी मरणार यार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा