५३६. अगत्य
सत्य जेव्हा येतं समोर
डळमळू लागतात श्रद्धा
कोणीच नाही खरं जगात
अगदी देव सुद्धा
देव समजून पुजावं ज्याला
तो ही निघतो खोटा
असंच होतं दरवेळी
होतो आणि तोटा
तरी नाही मानत मन
पुन्हा होतो शोध सुरू
पुन्हा पुन्हा खातो ठोकर
देवाचं ह्या काय करू
मानायचंच नाही आता
असेल ते असू देत सत्य
नसू देत नसला तर पुरावा
देवाचं असणं आहे अगत्य
--- लबाड बोका
सत्य जेव्हा येतं समोर
डळमळू लागतात श्रद्धा
कोणीच नाही खरं जगात
अगदी देव सुद्धा
देव समजून पुजावं ज्याला
तो ही निघतो खोटा
असंच होतं दरवेळी
होतो आणि तोटा
तरी नाही मानत मन
पुन्हा होतो शोध सुरू
पुन्हा पुन्हा खातो ठोकर
देवाचं ह्या काय करू
मानायचंच नाही आता
असेल ते असू देत सत्य
नसू देत नसला तर पुरावा
देवाचं असणं आहे अगत्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा