५३२. नि:स्वार्थी
नाही पडत पाया त्याच्या
नाही जोडत हात
नाही कधी आशाळभूतपणे
त्याच्याकडे मी पहात
फोडत नाही त्याच्यावर मी
वाईट झाल्याचं खापर
करत नाही त्याचा कधी
माझ्यासाठी वापर
मानत नाही त्याचे कधी
चांगल्यासाठी आभार
टाकत नाही कधीच मी
त्याच्यावरती भार
नाही ओवाळत कधीच मी
त्याचीसुद्धा आरती
त्याच्या भजनी लागायला
नाही काही मी स्वार्थी
--- लबाड बोका
नाही पडत पाया त्याच्या
नाही जोडत हात
नाही कधी आशाळभूतपणे
त्याच्याकडे मी पहात
फोडत नाही त्याच्यावर मी
वाईट झाल्याचं खापर
करत नाही त्याचा कधी
माझ्यासाठी वापर
मानत नाही त्याचे कधी
चांगल्यासाठी आभार
टाकत नाही कधीच मी
त्याच्यावरती भार
नाही ओवाळत कधीच मी
त्याचीसुद्धा आरती
त्याच्या भजनी लागायला
नाही काही मी स्वार्थी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा