५३३. आस्तिक
कोणी पसरवतात अफवा
कोणी घडवतात दंगली
कोणी टाकतात विकून
बायका पोरंच आपली
कोणी विकतात शरीर
कोणी विकतात इमान
कोणी बाळगत नाहीत
कसलीच चाड किमान
कोणी घालतात दरोडे
कोणी करतात चोऱ्या
कोणी असतात करत
दुर्बलांवर शिरजोऱ्या
कोणी करतात फसवणूक
कोणी करतात भ्रष्टाचार
कोणी करतात खून आणि
कोणी करतात बलात्कार
काहीच होत नाही उपयोग
देवाकडेही मागून दाद
आस्तिकांनीच मांडलाय ना
सारा हा उच्छाद
--- लबाड बोका
कोणी पसरवतात अफवा
कोणी घडवतात दंगली
कोणी टाकतात विकून
बायका पोरंच आपली
कोणी विकतात शरीर
कोणी विकतात इमान
कोणी बाळगत नाहीत
कसलीच चाड किमान
कोणी घालतात दरोडे
कोणी करतात चोऱ्या
कोणी असतात करत
दुर्बलांवर शिरजोऱ्या
कोणी करतात फसवणूक
कोणी करतात भ्रष्टाचार
कोणी करतात खून आणि
कोणी करतात बलात्कार
काहीच होत नाही उपयोग
देवाकडेही मागून दाद
आस्तिकांनीच मांडलाय ना
सारा हा उच्छाद
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा