५३७. काढता पाय
एक पाऊल टाकतो पुढे तर
दहा पावलं जातो मागे
जोर लावून खेचत असतात
नियतीचे ते अदृश्य धागे
असलं कसलं फुटकं नशीब
घेऊन जन्माला आलोय मी
कधीतरी काही होईल धड
वाटतंच नाही ह्याची हमी
कितीतरी आहेत कमनशीबी असे
मी ही आणखी त्यातलाच एक
काही उपयोग नसतो आणि
माणूस म्हणून असून नेक
असलं कसलं जगणं हे
नकोच वाटतं आता आयुष्य
काहीच नाही वाटत आशा
अंधकारमय दिसतंय भविष्य
सुचत नाही विचार करूनही
दुसरा असा काहीच उपाय
कुठपर्यंत कुढत जगावं असं
घ्यावा वाटतो काढता पाय
--- लबाड बोका
एक पाऊल टाकतो पुढे तर
दहा पावलं जातो मागे
जोर लावून खेचत असतात
नियतीचे ते अदृश्य धागे
असलं कसलं फुटकं नशीब
घेऊन जन्माला आलोय मी
कधीतरी काही होईल धड
वाटतंच नाही ह्याची हमी
कितीतरी आहेत कमनशीबी असे
मी ही आणखी त्यातलाच एक
काही उपयोग नसतो आणि
माणूस म्हणून असून नेक
असलं कसलं जगणं हे
नकोच वाटतं आता आयुष्य
काहीच नाही वाटत आशा
अंधकारमय दिसतंय भविष्य
सुचत नाही विचार करूनही
दुसरा असा काहीच उपाय
कुठपर्यंत कुढत जगावं असं
घ्यावा वाटतो काढता पाय
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा