५३८. कारणं
चांगलं वागून होत नाही
कधी कोणाचं भलं
म्हणून नाही वाटत मला
वागावंसं चांगलं
कधीतरी मी वागतो वाईट
मलाच पण ते वाटतं पाप
संस्कारांची पाळंमुळं
देत बसतात मनस्ताप
कधी देवा धर्माला आणि
कधी खोट्या प्रतिष्ठेला
कधी कायद्याच्या शिक्षेला
घाबरून वागतो चांगला
कधी नसते हिम्मत म्हणून
कधी वाटत असते भीती
माझ्या चांगल्या वागण्याची
कारणं तरी सांगू किती
--- लबाड बोका
चांगलं वागून होत नाही
कधी कोणाचं भलं
म्हणून नाही वाटत मला
वागावंसं चांगलं
कधीतरी मी वागतो वाईट
मलाच पण ते वाटतं पाप
संस्कारांची पाळंमुळं
देत बसतात मनस्ताप
कधी देवा धर्माला आणि
कधी खोट्या प्रतिष्ठेला
कधी कायद्याच्या शिक्षेला
घाबरून वागतो चांगला
कधी नसते हिम्मत म्हणून
कधी वाटत असते भीती
माझ्या चांगल्या वागण्याची
कारणं तरी सांगू किती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा