५३९. पाया
नीतीमत्तेच्या नादी लागून
वायाच गेली सगळी हयात
उशिरा का हाईना पण
आत्ता तरी मी आलोय वयात
वाचलं होतं कुठेतरी मी
ब्रह्मचर्य म्हणजेच जीवन
घालून ठेवल्या गाठी घट्ट
उसवूच नाही दिली शिवण
बरं झालं भेटलीस तू ते
गेलोच असतो नाहीतर वाया
घालीन आता तुझ्यासोबत
अध्यात्माचाच नवीन पाया
--- लबाड बोका
नीतीमत्तेच्या नादी लागून
वायाच गेली सगळी हयात
उशिरा का हाईना पण
आत्ता तरी मी आलोय वयात
वाचलं होतं कुठेतरी मी
ब्रह्मचर्य म्हणजेच जीवन
घालून ठेवल्या गाठी घट्ट
उसवूच नाही दिली शिवण
बरं झालं भेटलीस तू ते
गेलोच असतो नाहीतर वाया
घालीन आता तुझ्यासोबत
अध्यात्माचाच नवीन पाया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा