५४०. अजातमित्र
प्रत्येकाचेच असतात गुंफलेले
कशा ना कशात हितसंबंध
त्यांच्यापुढे क्षीण पडतात
मैत्री आणि नात्यांचे बंध
आवडत नाही कधीच मला
दुटप्पी वागणं लोकांचं
करत नाही समर्थन मी
कधीच माझ्याही चुकांचं
जे जे दिसतं सत्य मला
त्याचंच मी मांडतो चित्र
दुखावलेत सारे कधी ना कधी
कोणीच नाहीत उरले मित्र
--- लबाड बोका
प्रत्येकाचेच असतात गुंफलेले
कशा ना कशात हितसंबंध
त्यांच्यापुढे क्षीण पडतात
मैत्री आणि नात्यांचे बंध
आवडत नाही कधीच मला
दुटप्पी वागणं लोकांचं
करत नाही समर्थन मी
कधीच माझ्याही चुकांचं
जे जे दिसतं सत्य मला
त्याचंच मी मांडतो चित्र
दुखावलेत सारे कधी ना कधी
कोणीच नाहीत उरले मित्र
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा