५४८. टांग
बरेचजण विचारतात
माझं खरं नाव
मी सुद्धा खातो मग
उगाच थोडा भाव
घ्यायचं असतं त्यांना
माझ्याबद्दल जाणून
मी पण ठेवतो उगाच
कुतुहल त्यांचं ताणून
गोल गोल बोलून मी
टाळतो खरं उत्तर
निखळ मैत्रीचं तत्वज्ञान
त्यांनाच शिकवतो वर
काही होतात नाराज मग
काहींना येतो राग
म्हणत असतील मनात मला
तुझ्या नानाची टांग
--- लबाड बोका
बरेचजण विचारतात
माझं खरं नाव
मी सुद्धा खातो मग
उगाच थोडा भाव
घ्यायचं असतं त्यांना
माझ्याबद्दल जाणून
मी पण ठेवतो उगाच
कुतुहल त्यांचं ताणून
गोल गोल बोलून मी
टाळतो खरं उत्तर
निखळ मैत्रीचं तत्वज्ञान
त्यांनाच शिकवतो वर
काही होतात नाराज मग
काहींना येतो राग
म्हणत असतील मनात मला
तुझ्या नानाची टांग
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा