५४९. फरक
बोक्यांत आणि माणसांत
असतो भरपूर फरक
बोके कधीच नसतात पण
माणसंच असतात ठक
बोक्यांना नसतो जातधर्म
बोक्यांना नसतो देश
लपवत नाहीत ते रूप खरं
घालून खोटा वेश
बोके जगतात खरंखुरं
वाचत नाहीत गीता
बोके कधी मारत नाहीत
संस्कारांच्या बाता
माणसाचा जन्म जगूनही
माणुसकी नाही माणसांत
तरीही बोकेच बदनाम आणि
माणसं आहेत चान्सांत
--- लबाड बोका
बोक्यांत आणि माणसांत
असतो भरपूर फरक
बोके कधीच नसतात पण
माणसंच असतात ठक
बोक्यांना नसतो जातधर्म
बोक्यांना नसतो देश
लपवत नाहीत ते रूप खरं
घालून खोटा वेश
बोके जगतात खरंखुरं
वाचत नाहीत गीता
बोके कधी मारत नाहीत
संस्कारांच्या बाता
माणसाचा जन्म जगूनही
माणुसकी नाही माणसांत
तरीही बोकेच बदनाम आणि
माणसं आहेत चान्सांत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा