५४७. लक्षण
शांत असतो वारा तरीही
उठतात डोहात तरंग
तसंच काहीसं असतं
आपलं सुद्धा अंतरंग
एकामागून एक विचार
येत असतात मनात
करत असतात सोबत
नेहमी एकटेपणात
कधी कधी तर नसते
तशी काही संगती
कमी सुद्धा होत नाही
कधी त्यांची गती
काही काही विचार तर
देतात खूप त्रास
तर काही विचार मात्र
देतात मनास उल्हास
वाईट सुद्धा विचार कधी
काढतात डोकं वर
ठेवावा लागतो ताबा तेव्हा
आपलाच आपल्यावर
जात नाही त्यांच्याशिवाय
असा एकही क्षण
आपल्या जिवंतपणाचं
तेच आहे लक्षण
--- लबाड बोका
शांत असतो वारा तरीही
उठतात डोहात तरंग
तसंच काहीसं असतं
आपलं सुद्धा अंतरंग
एकामागून एक विचार
येत असतात मनात
करत असतात सोबत
नेहमी एकटेपणात
कधी कधी तर नसते
तशी काही संगती
कमी सुद्धा होत नाही
कधी त्यांची गती
काही काही विचार तर
देतात खूप त्रास
तर काही विचार मात्र
देतात मनास उल्हास
वाईट सुद्धा विचार कधी
काढतात डोकं वर
ठेवावा लागतो ताबा तेव्हा
आपलाच आपल्यावर
जात नाही त्यांच्याशिवाय
असा एकही क्षण
आपल्या जिवंतपणाचं
तेच आहे लक्षण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा