५५०. सर्वोत्तम नट
सर्वात मोठा देशद्रोही असतो
तो म्हणजे राजकारणी
आपल्या स्वत:च्या फायद्याची
असते त्याची विचारसरणी
तिलाच भासवतो देशभक्ती तो
धारण करतो मुखवटा
विचार न करताच घेतात लोक
खांद्यावरती त्याचा बावटा
छळ कपट कट कारस्थानं
असतो त्याचा हातखंडा
मूर्ख लोक बांधून घेतात
स्वत:हूनच त्याचा गंडा
तो नसतो कोणाचाच कधी
असतो फक्त स्वत:चा
देशाच्या नावे स्वत:साठीच
मागतो जोगवा मतांचा
एकच असा नसतो कधी
असतात असे बरेच उलट
जो होतो सर्वाधिक लोकप्रिय
तो असतो सर्वोत्तम नट
--- लबाड बोका
सर्वात मोठा देशद्रोही असतो
तो म्हणजे राजकारणी
आपल्या स्वत:च्या फायद्याची
असते त्याची विचारसरणी
तिलाच भासवतो देशभक्ती तो
धारण करतो मुखवटा
विचार न करताच घेतात लोक
खांद्यावरती त्याचा बावटा
छळ कपट कट कारस्थानं
असतो त्याचा हातखंडा
मूर्ख लोक बांधून घेतात
स्वत:हूनच त्याचा गंडा
तो नसतो कोणाचाच कधी
असतो फक्त स्वत:चा
देशाच्या नावे स्वत:साठीच
मागतो जोगवा मतांचा
एकच असा नसतो कधी
असतात असे बरेच उलट
जो होतो सर्वाधिक लोकप्रिय
तो असतो सर्वोत्तम नट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा