५५१. नशिबाची भेट
नशिबानेच झालोय माणूस मी
नाही झालो दुसरा प्राणी
किती म्हणून मानू तरी
नशिबाचे त्या उपकार आणि
त्यातही पुन्हा झालो पुरूष
नाही जन्मलो स्त्री म्हणून
खूप होतात यातना मला
स्त्रीजन्माचे भोग बघून
त्यातही नशिब झालो हिंदू
झालो तथाकथित उच्चवर्णी
नाही धर्माची बंधनं आता
जगता येतं मोकळेपणी
जन्मलो आणि महाराष्ट्रामध्ये
वारसा आयताच लाभला थोर
त्याचाच करून घेतो उपयोग
कापू पहात असतो दोर
नशिबानेच मिळाली चांगली नाती
नशिबानेच मिळालं रूपरंग
नशिबामुळेच तर आणि त्या
नाही मला कोणतंही व्यंग
नशिबानेच मिळालंय शिक्षण आणि
नशिबानेच मिळालीय तल्लख बुद्धी
धरतो कास सत्याची नेहमी
करून घेतो विचारांची शुद्धी
स्मरणशक्ती नी आकलनशक्ती
नशिबानेच मिळालीय थेट
काहीच नाही कर्तृत्व माझं
नशिबाचीच आहे ही सगळी भेट
--- लबाड बोका
नशिबानेच झालोय माणूस मी
नाही झालो दुसरा प्राणी
किती म्हणून मानू तरी
नशिबाचे त्या उपकार आणि
त्यातही पुन्हा झालो पुरूष
नाही जन्मलो स्त्री म्हणून
खूप होतात यातना मला
स्त्रीजन्माचे भोग बघून
त्यातही नशिब झालो हिंदू
झालो तथाकथित उच्चवर्णी
नाही धर्माची बंधनं आता
जगता येतं मोकळेपणी
जन्मलो आणि महाराष्ट्रामध्ये
वारसा आयताच लाभला थोर
त्याचाच करून घेतो उपयोग
कापू पहात असतो दोर
नशिबानेच मिळाली चांगली नाती
नशिबानेच मिळालं रूपरंग
नशिबामुळेच तर आणि त्या
नाही मला कोणतंही व्यंग
नशिबानेच मिळालंय शिक्षण आणि
नशिबानेच मिळालीय तल्लख बुद्धी
धरतो कास सत्याची नेहमी
करून घेतो विचारांची शुद्धी
स्मरणशक्ती नी आकलनशक्ती
नशिबानेच मिळालीय थेट
काहीच नाही कर्तृत्व माझं
नशिबाचीच आहे ही सगळी भेट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा