५५५. स्वयंभू
मोठा होण्यासाठी घेत नाही
देवाधर्माचा आधार
विचारांनाच आहे माझ्या
आपली स्वत:ची धार
थोरा मोठ्यांच्या नावावरती
नाही व्हायचाय मोठा
मला नाही गरज तसली
विचारच तसला खोटा
भरपूर उगवत असतात रोज
एकापेक्षा एक दंभू
मी नाही त्यांच्यासारखा
मी तर आहे स्वयंभू
--- लबाड बोका
मोठा होण्यासाठी घेत नाही
देवाधर्माचा आधार
विचारांनाच आहे माझ्या
आपली स्वत:ची धार
थोरा मोठ्यांच्या नावावरती
नाही व्हायचाय मोठा
मला नाही गरज तसली
विचारच तसला खोटा
भरपूर उगवत असतात रोज
एकापेक्षा एक दंभू
मी नाही त्यांच्यासारखा
मी तर आहे स्वयंभू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा