५५४. आशा
एक पाय ह्या दगडावर
तर दुसरा पाय त्या
मिळत नाहीत कधीच मला
कोणत्याच गोष्टी आयत्या
काही ना काहीतरी अशी
करावीच लागते कसरत
थोडी जरी झाली चूक
जायला होतं घसरत
पर्याय नसतो दुसरा काही
नसतो काही इलाज
कधी कधी जगण्यासाठी
सोडावी लागते लाज
तरीही वाटतं जगावंसं
नको वाटतं मरण
कधी ना कधी येईल वाटतं
नशीबसुद्धा शरण
--- लबाड बोका
एक पाय ह्या दगडावर
तर दुसरा पाय त्या
मिळत नाहीत कधीच मला
कोणत्याच गोष्टी आयत्या
काही ना काहीतरी अशी
करावीच लागते कसरत
थोडी जरी झाली चूक
जायला होतं घसरत
पर्याय नसतो दुसरा काही
नसतो काही इलाज
कधी कधी जगण्यासाठी
सोडावी लागते लाज
तरीही वाटतं जगावंसं
नको वाटतं मरण
कधी ना कधी येईल वाटतं
नशीबसुद्धा शरण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा