५५६. कोरी वही
असं कसं लिहू रोज
सुचायला तर हवं काही
पाऊससुद्धा आभाळातून
रोज रोज पडत नाही
ढगांसारखे विचारसुद्धा
दाटून यावे लागतात मनात
तेव्हा कुठे उतरतात ते
वहीच्या मग पानापानात
तशी माझी वहीसुद्धा
आहे अजून बरीच कोरी
कारण मला येत नाही
दुस-या कोणाची करता चोरी
--- लबाड बोका
असं कसं लिहू रोज
सुचायला तर हवं काही
पाऊससुद्धा आभाळातून
रोज रोज पडत नाही
ढगांसारखे विचारसुद्धा
दाटून यावे लागतात मनात
तेव्हा कुठे उतरतात ते
वहीच्या मग पानापानात
तशी माझी वहीसुद्धा
आहे अजून बरीच कोरी
कारण मला येत नाही
दुस-या कोणाची करता चोरी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा