५४५. जीवनेच्छा
रोजच होते पहाट आणि
रोजच उगवतो तोच सूर्य
रोजच उठून करावं लागतं
रोज रोज तेच कार्य
रोजच वाहतो वारा आणि
रोजच पडत असतं ऊन
त्यात काय विशेष एवढं
त्याचे काय गावेत गुण
रोजचीच होते तशीच रात
रोजचाच तोच तसाच दिन
रोजचेच आहेत चंद्र तारे
त्यात काय आहे नवीन
रोज रोज तेच पाहून
हे सगळं वाटतंय जून
तरीही का ते कळत नाही
जगावसं वाटतंय अजून
--- लबाड बोका
रोजच होते पहाट आणि
रोजच उगवतो तोच सूर्य
रोजच उठून करावं लागतं
रोज रोज तेच कार्य
रोजच वाहतो वारा आणि
रोजच पडत असतं ऊन
त्यात काय विशेष एवढं
त्याचे काय गावेत गुण
रोजचीच होते तशीच रात
रोजचाच तोच तसाच दिन
रोजचेच आहेत चंद्र तारे
त्यात काय आहे नवीन
रोज रोज तेच पाहून
हे सगळं वाटतंय जून
तरीही का ते कळत नाही
जगावसं वाटतंय अजून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा