५४६. नागडं सत्य
लहानपणी कशावरही
ठेवायचो मी विश्वास
केले होते कोणीतरी ते
सत्याचे फक्त आभास
मोठा जसा होत गेलो
कळत गेलं सत्य
त्या सगळ्या गोष्टींमध्ये
काहीच नव्हतं तथ्य
तेव्हापासून लागलं मला
सत्यशोधनाचं खूळ
सतावायचा प्रश्न मला
काय असेल मूळ
सत्याचा शोध घेत घेत
गेलो मागे एवढा
कळलं मला पूर्वज माझा
रहात होता नागडा
--- लबाड बोका
लहानपणी कशावरही
ठेवायचो मी विश्वास
केले होते कोणीतरी ते
सत्याचे फक्त आभास
मोठा जसा होत गेलो
कळत गेलं सत्य
त्या सगळ्या गोष्टींमध्ये
काहीच नव्हतं तथ्य
तेव्हापासून लागलं मला
सत्यशोधनाचं खूळ
सतावायचा प्रश्न मला
काय असेल मूळ
सत्याचा शोध घेत घेत
गेलो मागे एवढा
कळलं मला पूर्वज माझा
रहात होता नागडा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा