५६२. झेंडेकरी
नुसतं खरं बोलायची खोटी
आलेच सगळे अंगावर
ऐकूनच घेत नाहीत काही
जणू जंगली जनावर
कोणा ना कोणाकडे तरी
गहाण असते त्यांची अक्कल
सत्य जरी आलं समोर
घ्यायलाच मागत नाही दखल
देवाचं केलंय बुजगावणं त्यांनी
नुसताच भरून पेंढा
असेच लोक फडकावत असतात
धर्म संस्कृतीचा झेंडा
--- लबाड बोका
नुसतं खरं बोलायची खोटी
आलेच सगळे अंगावर
ऐकूनच घेत नाहीत काही
जणू जंगली जनावर
कोणा ना कोणाकडे तरी
गहाण असते त्यांची अक्कल
सत्य जरी आलं समोर
घ्यायलाच मागत नाही दखल
देवाचं केलंय बुजगावणं त्यांनी
नुसताच भरून पेंढा
असेच लोक फडकावत असतात
धर्म संस्कृतीचा झेंडा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा