५६६. शेवट
रोज बघतो आशेने पण
कोरडंच दिसतंय आभाळ
दुर्दैवाचे दशावतार माझे
काय सांगू कप्पाळ
करून टाकली होती पेरणी
पाऊस झाला म्हणून
सुकत चाललंय शेत आता
गेलाय तोंड घेऊन
आत्ता नाही पडला तर
होईल मोठं नुकसान
कर्ज आहे डोक्यावरती
गळून चाललंय अवसान
विचार करून करून येते
माझी मलाच कीव
सगळेच मार्ग खुंटले तर
द्यावाच लागेल जीव
--- लबाड बोका
रोज बघतो आशेने पण
कोरडंच दिसतंय आभाळ
दुर्दैवाचे दशावतार माझे
काय सांगू कप्पाळ
करून टाकली होती पेरणी
पाऊस झाला म्हणून
सुकत चाललंय शेत आता
गेलाय तोंड घेऊन
आत्ता नाही पडला तर
होईल मोठं नुकसान
कर्ज आहे डोक्यावरती
गळून चाललंय अवसान
विचार करून करून येते
माझी मलाच कीव
सगळेच मार्ग खुंटले तर
द्यावाच लागेल जीव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा