५६९. पाणी
तुझा उफाड्याचा बांधा पाहून
का कुणास ठाऊक
पण मला येते आठवण
माझ्या गावच्या बांधाची
तू हसतेस जेव्हा खळखळून
नेमकं आठवतं मला
त्याचं बांधातून
खळखळत वहायचं पाणी
अविरत
तुझे टपोरे पाणीदार डोळे
जेव्हा जेव्हा बघतो मी
का कुणास ठाऊक
मला मात्र आठवतं
आता त्या बांधात नसलेलं पाणी
--- लबाड बोका
तुझा उफाड्याचा बांधा पाहून
का कुणास ठाऊक
पण मला येते आठवण
माझ्या गावच्या बांधाची
तू हसतेस जेव्हा खळखळून
नेमकं आठवतं मला
त्याचं बांधातून
खळखळत वहायचं पाणी
अविरत
तुझे टपोरे पाणीदार डोळे
जेव्हा जेव्हा बघतो मी
का कुणास ठाऊक
मला मात्र आठवतं
आता त्या बांधात नसलेलं पाणी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा