५७१. उदो उदो
एकापेक्षाही एक एक
झाले आहेत वरताण
भाटांनाही मिळू लागलाय
शिवरायांसारखाच मान
माहित आहे त्यांनाही पक्कं
राजे होणं आहे कठीण
त्यांचा जयजयकार करूनही
मिरवता येतं रात्रंदिन
मान मरातब पद प्रतिष्ठा
भरता येतात आरामात पोटं
व्यवहारी ह्या दुनियेमध्ये
चालवता येतं नाणं खोटं
उघडत नाहीत चुकून कधी
धेंडांविरोधात ह्यांची तोंडं
ह्याच्या आणि त्याच्या पुढे
घोळत असतात नुसते गोंडं
पहा कसा आलाय काळ
राहून राहून वाटतो खेदो
खरे रहातात मागे आणि
कम अस्सलांचा होतो उदो
--- लबाड बोका
एकापेक्षाही एक एक
झाले आहेत वरताण
भाटांनाही मिळू लागलाय
शिवरायांसारखाच मान
माहित आहे त्यांनाही पक्कं
राजे होणं आहे कठीण
त्यांचा जयजयकार करूनही
मिरवता येतं रात्रंदिन
मान मरातब पद प्रतिष्ठा
भरता येतात आरामात पोटं
व्यवहारी ह्या दुनियेमध्ये
चालवता येतं नाणं खोटं
उघडत नाहीत चुकून कधी
धेंडांविरोधात ह्यांची तोंडं
ह्याच्या आणि त्याच्या पुढे
घोळत असतात नुसते गोंडं
पहा कसा आलाय काळ
राहून राहून वाटतो खेदो
खरे रहातात मागे आणि
कम अस्सलांचा होतो उदो
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा