५७३. माणसं
काहींना मी मानतो जवळचं
पण दाखवत नाही तसं
जास्त आपुलकी दाखवली की
गळ्यातच पडतात माणसं
काहींना मी टाळतो सरळ
वागतातच ते तसं
अशांना जवळ केली की
गोत्यात आणतात माणसं
काहींशी माझं आहे नातं
मैत्रीचं असतं तसं
जीवाला जीव संकटात साथ
देतात अशी माणसं
काहींशी माझं आहे भांडण
हाडवैर असावं तसं
संधी मिळेल तेव्हा माझं
वाईट करतात माणसं
काहींशी मी वागतो फक्त
प्रेमात वागतात तसं
आपल्यावर सुद्धा काही
प्रेम करतात माणसं
--- लबाड बोका
काहींना मी मानतो जवळचं
पण दाखवत नाही तसं
जास्त आपुलकी दाखवली की
गळ्यातच पडतात माणसं
काहींना मी टाळतो सरळ
वागतातच ते तसं
अशांना जवळ केली की
गोत्यात आणतात माणसं
काहींशी माझं आहे नातं
मैत्रीचं असतं तसं
जीवाला जीव संकटात साथ
देतात अशी माणसं
काहींशी माझं आहे भांडण
हाडवैर असावं तसं
संधी मिळेल तेव्हा माझं
वाईट करतात माणसं
काहींशी मी वागतो फक्त
प्रेमात वागतात तसं
आपल्यावर सुद्धा काही
प्रेम करतात माणसं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा