५७९. चूक
काही गोष्टी मिळणारच नसतात
हरणारच असतो आपण खेळ
तरी सुद्धा त्यांच्याच पाठी
घालवत असतो आपला वेळ
एक आस असते मनात
तीच बसू देत नाही स्वस्थ
म्हणून असतो पुन्हा पुन्हा
प्रयत्नांची करीत शिकस्त
धावत असतो मृगजळामागे
मिळत नाही कधीच सुख
सगळं काही संपल्यावरती
उमगून येते आपली चूक
--- लबाड बोका
काही गोष्टी मिळणारच नसतात
हरणारच असतो आपण खेळ
तरी सुद्धा त्यांच्याच पाठी
घालवत असतो आपला वेळ
एक आस असते मनात
तीच बसू देत नाही स्वस्थ
म्हणून असतो पुन्हा पुन्हा
प्रयत्नांची करीत शिकस्त
धावत असतो मृगजळामागे
मिळत नाही कधीच सुख
सगळं काही संपल्यावरती
उमगून येते आपली चूक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा