५७८. अधांतरी
कितींदा उठतो राखेतून
पुन्हा पुन्हा लागते आग
जरा कुठे असतो सावरत
जळून पुन्हा होतो खाक
आणि मग जातो खचून
चीत होतो मुंड्या चारी
कशी कुठून कळत नाही
तरी धरतो पुन्हा उभारी
हेच चालू आहे कधीचं
कधी मिळणार आहे यश
माहित नाही कधी होईल
माझं नशीब मला वश
तरी पहात असतो जगू
करून दाखवायचंय काहीतरी
मन आहे अतृप्त अजून
जीवही आहे अधांतरी
--- लबाड बोका
कितींदा उठतो राखेतून
पुन्हा पुन्हा लागते आग
जरा कुठे असतो सावरत
जळून पुन्हा होतो खाक
आणि मग जातो खचून
चीत होतो मुंड्या चारी
कशी कुठून कळत नाही
तरी धरतो पुन्हा उभारी
हेच चालू आहे कधीचं
कधी मिळणार आहे यश
माहित नाही कधी होईल
माझं नशीब मला वश
तरी पहात असतो जगू
करून दाखवायचंय काहीतरी
मन आहे अतृप्त अजून
जीवही आहे अधांतरी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा