५७६. वैगुण्य
आम्हाला कधी लागलाच नाही
मंद बिंद वारा
आम्ही कधी पाहिलाच नाही
शुक्र बिक्र तारा
आम्ही नाही फिरलोच कधी
गाणी बिणी गात
आम्ही नाही घातले गळ्यात
चांदण्या बिंदण्यांचे हात
आम्हाला कधी झालेच नाही
भास बिस कुणाचे
आम्हाला नाही जाणवले वय
कोवळे बिवळे ऊन्हाचे
आम्ही नाही खेळलोच कधी
लीला बीला रास
आम्हाला कधी जाणवलाच नाही
सुगंधित बिगंधित श्वास
आम्ही नाही थकलो कधी
नाव बिव जपता
आम्ही नाही घेतल्या कधी
हळव्या बिळव्या शपथा
आम्ही नाही केलं कधी
प्रेमा बिमात कवन
आम्हाला नाही आली कधी
गुलाबी बिलाबी आठवण
आम्हाला कधी दिसलंच नाही
मलमली बिलमली तारुण्य
आम्हाला कधी कळलंच नाही
आमच्यामधलंच वैगुण्य
--- लबाड बोका
आम्हाला कधी लागलाच नाही
मंद बिंद वारा
आम्ही कधी पाहिलाच नाही
शुक्र बिक्र तारा
आम्ही नाही फिरलोच कधी
गाणी बिणी गात
आम्ही नाही घातले गळ्यात
चांदण्या बिंदण्यांचे हात
आम्हाला कधी झालेच नाही
भास बिस कुणाचे
आम्हाला नाही जाणवले वय
कोवळे बिवळे ऊन्हाचे
आम्ही नाही खेळलोच कधी
लीला बीला रास
आम्हाला कधी जाणवलाच नाही
सुगंधित बिगंधित श्वास
आम्ही नाही थकलो कधी
नाव बिव जपता
आम्ही नाही घेतल्या कधी
हळव्या बिळव्या शपथा
आम्ही नाही केलं कधी
प्रेमा बिमात कवन
आम्हाला नाही आली कधी
गुलाबी बिलाबी आठवण
आम्हाला कधी दिसलंच नाही
मलमली बिलमली तारुण्य
आम्हाला कधी कळलंच नाही
आमच्यामधलंच वैगुण्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा