५७७. हुंदका
खोटंच सांगत असतो जगाला
सुखात मी आहे म्हणून
तरीही विचारत असतात लोक
जाणून बुजून खणून खणून
माझं काय जळतंय ते
माझं मलाच आहे ठाऊक
माझ्याही नकळतच मग
होऊन जातो मीच भावूक
लक्षात असतो मनामध्ये
एकूण एक एक दणका
रडू येत असतं तरी
आवरून धरतो हुंदका
--- लबाड बोका
खोटंच सांगत असतो जगाला
सुखात मी आहे म्हणून
तरीही विचारत असतात लोक
जाणून बुजून खणून खणून
माझं काय जळतंय ते
माझं मलाच आहे ठाऊक
माझ्याही नकळतच मग
होऊन जातो मीच भावूक
लक्षात असतो मनामध्ये
एकूण एक एक दणका
रडू येत असतं तरी
आवरून धरतो हुंदका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा