५८२. नांगरणी
खूप केले प्रयत्न आणि
खूप केली धडपड
रूढ वाटा सोडून सगळ्या
चढत होतो चढ
मिळालंच नाही यश पण
निघून गेली वेळ
आयुष्य आलं सरत तरी
जमलाच नाही मेळ
करतो आहे विचार पुन्हा
तरीही जाता जाता
माती झाली आयुष्याची
नांगरली पाहिजे आता
--- लबाड बोका
खूप केले प्रयत्न आणि
खूप केली धडपड
रूढ वाटा सोडून सगळ्या
चढत होतो चढ
मिळालंच नाही यश पण
निघून गेली वेळ
आयुष्य आलं सरत तरी
जमलाच नाही मेळ
करतो आहे विचार पुन्हा
तरीही जाता जाता
माती झाली आयुष्याची
नांगरली पाहिजे आता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा