५८१. सुटसुटीत
ठरवलं होतं मनात मी
छान छान सगळं
नियतीच्या मनात मात्र
होतं काही वेगळं
लावू पहात होतो मी
आभाळाला हात
काढीन म्हणत होतो पाणी
मारीन जिथे लाथ
भिरकावून दिलं नियतीने पण
मला कुठल्या कुठे
झाले आहेत भाग आता
सगळे सुटे सुटे
--- लबाड बोका
ठरवलं होतं मनात मी
छान छान सगळं
नियतीच्या मनात मात्र
होतं काही वेगळं
लावू पहात होतो मी
आभाळाला हात
काढीन म्हणत होतो पाणी
मारीन जिथे लाथ
भिरकावून दिलं नियतीने पण
मला कुठल्या कुठे
झाले आहेत भाग आता
सगळे सुटे सुटे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा