५८६. खोड
एक एक अनुभव मी
घेत असतो विकत
इतक्या करतो चुका पण
काहीच नाही शिकत
कसं म्हणावं हुशार मला
कसं म्हणावं शहाणा
करत असतो वरती आणखी
काही ना काही बहाणा
काढू पहात असतो मी
ह्यावरही काही तोड
जाणार नाही वाटतं पण
मेल्याशिवाय माझी खोड
--- लबाड बोका
एक एक अनुभव मी
घेत असतो विकत
इतक्या करतो चुका पण
काहीच नाही शिकत
कसं म्हणावं हुशार मला
कसं म्हणावं शहाणा
करत असतो वरती आणखी
काही ना काही बहाणा
काढू पहात असतो मी
ह्यावरही काही तोड
जाणार नाही वाटतं पण
मेल्याशिवाय माझी खोड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा