५९६. खरं कारण
मी हे वाचलंय, मी ते वाचलंय
मिरवतो मी शेखी
भाबड्या लोकांच्या तोंडावरती
करतो फेकाफेकी
ते ही जातात दबून मग
रहातात मला वचकून
समजू लागतात मला ज्ञानी
मी ही जातो सुखावून
त्यांनाही येत असतं वाचता
त्यांनाही असते आवड
संसाराच्या रामरगाड्यात
नसते बिचाऱ्यांना सवड
मी मात्र असतो वाचत
जमवून चांगलाच मेळ
असतो कारण माझ्याकडे
त्यांच्यापेक्षा जास्त वेळ
--- लबाड बोका
मी हे वाचलंय, मी ते वाचलंय
मिरवतो मी शेखी
भाबड्या लोकांच्या तोंडावरती
करतो फेकाफेकी
ते ही जातात दबून मग
रहातात मला वचकून
समजू लागतात मला ज्ञानी
मी ही जातो सुखावून
त्यांनाही येत असतं वाचता
त्यांनाही असते आवड
संसाराच्या रामरगाड्यात
नसते बिचाऱ्यांना सवड
मी मात्र असतो वाचत
जमवून चांगलाच मेळ
असतो कारण माझ्याकडे
त्यांच्यापेक्षा जास्त वेळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा