५९७. बलात्कार
कधी संपतील भोग हे
कधी होईल सुटका
सहन होत नाहीय आता
एक सुद्धा चटका
संपत आलं आहे खरंतर
जगण्यातलंच सगळं त्राण
वाट तरीही बघतो आहे
डोळ्यांमध्ये आणून प्राण
वाटत असतं मनामधून
होईल काही चमत्कार
रोज रोज करत असतं
नशीब सालं बलात्कार
--- लबाड बोका
तळटीप - निव्वळ रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या, हातावर पोट असलेल्या, अन्यायाने पिचलेल्या, कीडामुंग्यांचं आयुष्य जगणा-या त्या अभागी माणसांच्या आयुष्यावर आधारीत आहे ही कविता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा