५९८. अशी करायची कविता
सांगतो मी तुम्हाला आता
कशी करायची कविता
येईल मनात ते लिहायचं
कुणालाही न भीता
नक्की काय सांगायचं आहे
ते ही आधी ठरवायचं मनात
करायची नाही पर्वा अजिबात
कोण काय म्हणेल जनात
सुचेल मग आपोआपच
त्याची फक्त करायची जुळणी
चवीसाठी टाकायचं मीठ
होऊन जाईल नाहीतर अळणी
भाषा वापरायची ओघवती आणि
नेहमीच्याच वापरामधली
होऊन जाईल कविता तुमची
तुमच्याच तर मनामधली
--- लबाड बोका
सांगतो मी तुम्हाला आता
कशी करायची कविता
येईल मनात ते लिहायचं
कुणालाही न भीता
नक्की काय सांगायचं आहे
ते ही आधी ठरवायचं मनात
करायची नाही पर्वा अजिबात
कोण काय म्हणेल जनात
सुचेल मग आपोआपच
त्याची फक्त करायची जुळणी
चवीसाठी टाकायचं मीठ
होऊन जाईल नाहीतर अळणी
भाषा वापरायची ओघवती आणि
नेहमीच्याच वापरामधली
होऊन जाईल कविता तुमची
तुमच्याच तर मनामधली
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा