५९३. वक्ता
मी बघतो मुग्ध होऊन
त्यांचं सगळं भाषण
होऊन जातो चकीत आणि
ठोकतो सलाम मनोमन
ते करत असतात स्वत:ला
अस्सं काही पेश
रोमांच उठतात अंगावर
पाहून त्यांचा आवेश
काय ती त्यांची आणि
भाषेवरची पकड
विषयाचा सखोल अभ्यास
वाटू लागते निकड
शब्दा शब्दा त्यांच्या
असते नुसती तळमळ
नसताना सुद्धा जखम
वाहू लागते भळभळ
असं वाटतं आता तर
तेच करणार उद्धार
ते सोडून बाकी सारे
वाटू लागतात गद्दार
नाव सुद्धा त्यांचं आणि
असतं केवढं मोठं
आपल्याला बाबा नाही जमत
वागायला असं खोटं
--- लबाड बोका
मी बघतो मुग्ध होऊन
त्यांचं सगळं भाषण
होऊन जातो चकीत आणि
ठोकतो सलाम मनोमन
ते करत असतात स्वत:ला
अस्सं काही पेश
रोमांच उठतात अंगावर
पाहून त्यांचा आवेश
काय ती त्यांची आणि
भाषेवरची पकड
विषयाचा सखोल अभ्यास
वाटू लागते निकड
शब्दा शब्दा त्यांच्या
असते नुसती तळमळ
नसताना सुद्धा जखम
वाहू लागते भळभळ
असं वाटतं आता तर
तेच करणार उद्धार
ते सोडून बाकी सारे
वाटू लागतात गद्दार
नाव सुद्धा त्यांचं आणि
असतं केवढं मोठं
आपल्याला बाबा नाही जमत
वागायला असं खोटं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा