५९०. शेवटाची सुरूवात
झाकून ठेवलंत कोंबडं तरी
झालीच आहे पहाट
फुटू लागलंय तांबडं आणि
दिसू लागलीय वाट
उगवेल आता सूर्य आणि
दिसू लागेल लख्ख
जागं होईल आता आणि
ग्लानीतून जग अख्खं
किती दिवस करणार आहात
सत्याकडे अजून डोळेझाक
उरणार नाही आता तुमचा
पहिल्यासारखा धाक
--- लबाड बोका
झाकून ठेवलंत कोंबडं तरी
झालीच आहे पहाट
फुटू लागलंय तांबडं आणि
दिसू लागलीय वाट
उगवेल आता सूर्य आणि
दिसू लागेल लख्ख
जागं होईल आता आणि
ग्लानीतून जग अख्खं
किती दिवस करणार आहात
सत्याकडे अजून डोळेझाक
उरणार नाही आता तुमचा
पहिल्यासारखा धाक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा