६०२. उगाच
वेळ घालवतो असातसा
पेपर वाचतो उगाच
त्याच त्याच पुन्हा पुन्हा
बातम्या बघतो उगाच
भूक नसते तरी कधी
खात असतो उगाच
झोप नसते लागत तरी
पडून असतो उगाच
फिरतो कधी उकडे तिकडे
नसताना कारण उगाच
ह्याच्या त्याच्या घरामध्ये
डोकावून बघतो उगाच
भेटतं कोणी वाटेमध्ये
मस्करी करतो उगाच
बघत असतात टाळू तरी
त्यांना धरतो उगाच
ऐकणारेही भेटतात कधी
बाता मारतो उगाच
कुठे कुठे ऐकलं वाचलेलं
ज्ञान पाजळतो उगाच
दिसतात कधी सुंदर कोणी
तापवून घेतो उगाच
देत नाही कोणी तरी
लाईन मारतो उगाच
काम नाही धंदा नाही
हिशोब मांडतो उगाच
कधी न पूर्ण होणारी
स्वप्नं बघतो उगाच
येतं म्हणून मनामध्ये
काहीही करतो उगाच
जायचंच आहे कधीतरी
जगतो आहे उगाच
--- लबाड बोका
वेळ घालवतो असातसा
पेपर वाचतो उगाच
त्याच त्याच पुन्हा पुन्हा
बातम्या बघतो उगाच
भूक नसते तरी कधी
खात असतो उगाच
झोप नसते लागत तरी
पडून असतो उगाच
फिरतो कधी उकडे तिकडे
नसताना कारण उगाच
ह्याच्या त्याच्या घरामध्ये
डोकावून बघतो उगाच
भेटतं कोणी वाटेमध्ये
मस्करी करतो उगाच
बघत असतात टाळू तरी
त्यांना धरतो उगाच
ऐकणारेही भेटतात कधी
बाता मारतो उगाच
कुठे कुठे ऐकलं वाचलेलं
ज्ञान पाजळतो उगाच
दिसतात कधी सुंदर कोणी
तापवून घेतो उगाच
देत नाही कोणी तरी
लाईन मारतो उगाच
काम नाही धंदा नाही
हिशोब मांडतो उगाच
कधी न पूर्ण होणारी
स्वप्नं बघतो उगाच
येतं म्हणून मनामध्ये
काहीही करतो उगाच
जायचंच आहे कधीतरी
जगतो आहे उगाच
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा