६०१. मनाविरूद्ध
वाटत होतं करावंसं
काही चांगलं काम
तुमचं ऐकून आता मात्र
झालो पुरता बदनाम
वाटत होतं वागावंसं
सर्वांशी एकदम सरळ
भेट तुमची घडल्यापासून
ओकू लागलो गरळ
मानत होतो प्रत्येक स्त्रीला
भगिनी नाहीतर माता
तोच मी साधा भोळा
पिसाट ठरलोय आता
होते माझे विचार तसे
मुळात एकदम शुद्ध
तुम्हीच केला होता उपदेश
वाग मनाविरूद्ध
--- लबाड बोका
वाटत होतं करावंसं
काही चांगलं काम
तुमचं ऐकून आता मात्र
झालो पुरता बदनाम
वाटत होतं वागावंसं
सर्वांशी एकदम सरळ
भेट तुमची घडल्यापासून
ओकू लागलो गरळ
मानत होतो प्रत्येक स्त्रीला
भगिनी नाहीतर माता
तोच मी साधा भोळा
पिसाट ठरलोय आता
होते माझे विचार तसे
मुळात एकदम शुद्ध
तुम्हीच केला होता उपदेश
वाग मनाविरूद्ध
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा