६०४. नालायक
वाटत नाही जमेल असं
तुझं आणि माझं
सांगतो तुला स्पष्ट करून
सगळं काही आज
तुझ्या आणि माझ्यामध्ये
आहे खूप अंतर
खात्री आहे मला तशी
वाद होतील नंतर
करावं लागेल सहन तुला
ओझं माझ्या ढंगाचं
होईल तुलाच नंतर मग
दुख्ख अपेक्षाभंगाचं
तुझं आहे सगळं कसं
मोजून आणि मापून
मी ठेवत नाही काही
माझं असं जपून
तुझ्या माझ्या आवडीसुद्धा
आहेत वेगवेगळ्या
तुला आवडतात फळं फक्त
मला आवडतात कळ्या
मी रमतो स्वप्नांमध्ये
तू असतेस वास्तवात
मी असतो शोधत काव्य
पानांवरल्या दवात
मी माझं आत्तापर्यंत
दिलंय उधळून आयुष्य
तू नकोस घेऊ बिघडवून
स्वत:च स्वत:चं भविष्य
मी भणंग सडाफटिंग
जगतोय फक्त जुजबी
तू आहेस माझ्यापेक्षा
सर्वच बाबतीत उजवी
तू शोध दुसरा कुणी
तुला साजेसा नायक
मला वाटतं तुझ्यासाठी
आहे मी नालायक
--- लबाड बोका
वाटत नाही जमेल असं
तुझं आणि माझं
सांगतो तुला स्पष्ट करून
सगळं काही आज
तुझ्या आणि माझ्यामध्ये
आहे खूप अंतर
खात्री आहे मला तशी
वाद होतील नंतर
करावं लागेल सहन तुला
ओझं माझ्या ढंगाचं
होईल तुलाच नंतर मग
दुख्ख अपेक्षाभंगाचं
तुझं आहे सगळं कसं
मोजून आणि मापून
मी ठेवत नाही काही
माझं असं जपून
तुझ्या माझ्या आवडीसुद्धा
आहेत वेगवेगळ्या
तुला आवडतात फळं फक्त
मला आवडतात कळ्या
मी रमतो स्वप्नांमध्ये
तू असतेस वास्तवात
मी असतो शोधत काव्य
पानांवरल्या दवात
मी माझं आत्तापर्यंत
दिलंय उधळून आयुष्य
तू नकोस घेऊ बिघडवून
स्वत:च स्वत:चं भविष्य
मी भणंग सडाफटिंग
जगतोय फक्त जुजबी
तू आहेस माझ्यापेक्षा
सर्वच बाबतीत उजवी
तू शोध दुसरा कुणी
तुला साजेसा नायक
मला वाटतं तुझ्यासाठी
आहे मी नालायक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा