६०५. उध्वस्त
रोज रोज असते जीवाला
साली उद्याची चिंता
थकून जायला होतं खूप
धागा धागा विणता
रोज कमवायचं रोज खायचं
हातावरचं सालं पोट
नशिबातच आहे आपल्या
काहीतरी नक्की खोट
काडी काडी जोडून सालं
बांधलेलं असतं घरटं
येतं अचानक वादळ आणि
उध्वस्त होतं पुरतं
--- लबाड बोका
रोज रोज असते जीवाला
साली उद्याची चिंता
थकून जायला होतं खूप
धागा धागा विणता
रोज कमवायचं रोज खायचं
हातावरचं सालं पोट
नशिबातच आहे आपल्या
काहीतरी नक्की खोट
काडी काडी जोडून सालं
बांधलेलं असतं घरटं
येतं अचानक वादळ आणि
उध्वस्त होतं पुरतं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा