६०६. अदृश्य धागे
मी असतो मारत नेहमी
माझ्याच जीवावर उड्या
जेवढ्या मारतो उंच जास्त
तेवढ्या मोडतात तंगड्या
तंगड्यांचं काय घेऊन बसलात
कितींदा फुटलंय डोकं
मलाच तर हसत असतात
आजूबाजूची लोकं
तरीही करतो तेच पुन्हा
हटत नाही मागे
कळत नाही खेचतात कुठून
कुठले अदृश्य धागे
--- लबाड बोका
मी असतो मारत नेहमी
माझ्याच जीवावर उड्या
जेवढ्या मारतो उंच जास्त
तेवढ्या मोडतात तंगड्या
तंगड्यांचं काय घेऊन बसलात
कितींदा फुटलंय डोकं
मलाच तर हसत असतात
आजूबाजूची लोकं
तरीही करतो तेच पुन्हा
हटत नाही मागे
कळत नाही खेचतात कुठून
कुठले अदृश्य धागे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा