६०८. च्युतिये
कोणीच नाही आलं रंगवायला
मीच मला फासले रंग
लाल भगवा हिरवा निळा
माखून घेतलं सारं अंग
कोणालाच काही कळलं नाही
करत होतो मी ते ढोंग
जसं हवं होतं तसंच
हुबेहूब वठलं सोंग
मला सुद्धा पहायचं होतं
कोण कोण आहेत कसे
मी सुद्धा दिल्या घोषणा
त्यांच्या सारखेच फोडून घसे
कोणीच नाही ओळखलं मला
सगळेच लागले माझ्या नादी
कोणी दिली मला गादी
कोणी दिली मला मादी
एकापेक्षा एक होते
रथी महारथी जिथे तिथे
वाटलं नव्हतं मला पण
सगळे साले निघाले च्युतिये
--- लबाड बोका
कोणीच नाही आलं रंगवायला
मीच मला फासले रंग
लाल भगवा हिरवा निळा
माखून घेतलं सारं अंग
कोणालाच काही कळलं नाही
करत होतो मी ते ढोंग
जसं हवं होतं तसंच
हुबेहूब वठलं सोंग
मला सुद्धा पहायचं होतं
कोण कोण आहेत कसे
मी सुद्धा दिल्या घोषणा
त्यांच्या सारखेच फोडून घसे
कोणीच नाही ओळखलं मला
सगळेच लागले माझ्या नादी
कोणी दिली मला गादी
कोणी दिली मला मादी
एकापेक्षा एक होते
रथी महारथी जिथे तिथे
वाटलं नव्हतं मला पण
सगळे साले निघाले च्युतिये
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा