६०९. वास्तव
करतात माझी टिंगल आणि
हसतात मला लोक
खपवत असतात माझ्या नावावर
काहीसुद्धा ज्योक
लायकी नाही माझी म्हणतात
ठेवतात मला नावं
करत असतात माझ्या बाबतीत
नेहमीच फक्त डावं
त्यांना वाटतं नाही माझी
समाजामध्ये पत
उगाच का आहे माझ्याकडे
एवढं एकगठ्ठा मत
लोकांना जरी नसलं तरी
ज्यांना आहे माहित
ते करतात जवळ मला
पाहून त्यांचं हित
हसणाऱ्यांना राहू दे हसत
मी झालोय मंत्री
माझी तर बुवा आहे मजा
आता रोज रात्री
--- लबाड बोका
करतात माझी टिंगल आणि
हसतात मला लोक
खपवत असतात माझ्या नावावर
काहीसुद्धा ज्योक
लायकी नाही माझी म्हणतात
ठेवतात मला नावं
करत असतात माझ्या बाबतीत
नेहमीच फक्त डावं
त्यांना वाटतं नाही माझी
समाजामध्ये पत
उगाच का आहे माझ्याकडे
एवढं एकगठ्ठा मत
लोकांना जरी नसलं तरी
ज्यांना आहे माहित
ते करतात जवळ मला
पाहून त्यांचं हित
हसणाऱ्यांना राहू दे हसत
मी झालोय मंत्री
माझी तर बुवा आहे मजा
आता रोज रात्री
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा