६१०. पक्ष स्थापना
कधी कधी येतो मला
खूप खूप राग
लावावीशी वाटते मला
सगळ्या जगाला आग
माहित असतं पण मला
नाही मुळी हे शक्य
करावंच लागतं नाईलाजाने
मान्य तेही सत्य
बसतो मग मी हात चोळत
स्वत:शीच कुढत
म्हणतो आणि मनामध्ये
गेले सगळे उडत
ते ही देत नाहीत कुणी
माझ्याकडे मुळी लक्ष
थांबा आता काढतोच मी
एक नवीन पक्ष
--- लबाड बोका
कधी कधी येतो मला
खूप खूप राग
लावावीशी वाटते मला
सगळ्या जगाला आग
माहित असतं पण मला
नाही मुळी हे शक्य
करावंच लागतं नाईलाजाने
मान्य तेही सत्य
बसतो मग मी हात चोळत
स्वत:शीच कुढत
म्हणतो आणि मनामध्ये
गेले सगळे उडत
ते ही देत नाहीत कुणी
माझ्याकडे मुळी लक्ष
थांबा आता काढतोच मी
एक नवीन पक्ष
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा