६११. संयम
एकामागोमाग एक बहरतात
वेगवेगळी फुलं
पाहून त्यांना हरखून जातो
आपोआपच मी पण
कुणी असतात नाजूक साजूक
कुणी असतात भडक
कुणी असतात गरीब गाय
कुणी असतात कडक
कुणा सोबत असतात काटे
कुणी असतात एकटी
कुणी असतात खूप सुंदर
कुणी असतात नकटी
वाटतात सगळी हवीहवीशी
पण लावत नाही हात
पाहून त्यांना सोडतो उसासे
आणि बसतो गात
आहे जरी ताकद तरी
पाळतो एक नियम
त्यांचं त्यांना फुलू देतो
पाळतो आणि संयम
--- लबाड बोका
एकामागोमाग एक बहरतात
वेगवेगळी फुलं
पाहून त्यांना हरखून जातो
आपोआपच मी पण
कुणी असतात नाजूक साजूक
कुणी असतात भडक
कुणी असतात गरीब गाय
कुणी असतात कडक
कुणा सोबत असतात काटे
कुणी असतात एकटी
कुणी असतात खूप सुंदर
कुणी असतात नकटी
वाटतात सगळी हवीहवीशी
पण लावत नाही हात
पाहून त्यांना सोडतो उसासे
आणि बसतो गात
आहे जरी ताकद तरी
पाळतो एक नियम
त्यांचं त्यांना फुलू देतो
पाळतो आणि संयम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा